kimaya narayan
प्राईम व्हिडिओवर जयदीप अहलावतची बहुचर्चित पाताल लोक वेबसिरीजचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 17 जानेवारीला ही वेबसिरीज रिलीज होतेय.
जॅकी श्रॉफ यांची मुख्य भूमिका असलेली चिडिया उड ही वेबसिरीज MX प्लेयरवर रिलीज होईल. जॅकी बरोबर सिकंदर खेर आणि मीना यांच्याही भूमिका आहेत.
सध्या कॅन्सरशी धीराने झुंज देणारी अभिनेत्री हीना खानची वेब सिरीज गृहलक्ष्मी रिलीज होतेय. 16 जानेवारीला एपिक ऑन या प्लॅटफॉर्मवर ही रिलीज होणार आहे.
बाप मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा आय वॉन्ट टू टॉक हा सिनेमा रिलीज होतोय. अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका आहे. प्राईम व्हिडिओवर हा 17 जानेवारीपासून पाहता येईल.
हृतिक, राकेश आणि राजेश रोशन कुटूंबाबची कथा सांगणारी द रोशन ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. 17 जानेवारीला नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
सध्या चर्चेत असलेला पॉवर ऑफ पाँच हा शो 17 जानेवारीला हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. सुपरनॅचरल थीमवर हा शो आधारित आहे.