Vrushal Karmarkar
अलिकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.
अभिनेते अशोक सराफ यांना मराठी चित्रपटसृष्टीत मोठे स्थान आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ते लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
मात्र हे स्थान गाठण्यासाठीचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अनेक अडथड पार करत मेहनतीने हे स्थान गाठले आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग हे त्यांच्या चाहत्यांनाही माहिती नाही.
गेल्या ५० वर्षांपासून अशोक मामांनी त्यांच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. मात्र यासोबतच त्यांचे अनेक किस्से लोकांना माहिती नाही.
आपल्याला वाटतं की, मराठी सिनेसृष्टीत सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांनीच अभिनय क्षेत्रात बाल कलाकार म्हणून पाऊल ठेवलं होतं.
पण अशोक सराफांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी थिअटर करायला सुरूवात केली होती. सहाव्या वर्षांपासून त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
अशोक सराफ यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्येही नोकरी केली होती. ही नोकरी करत असताना ते एकाकिंका, नाटकंही करत होते.
अशोक सराफ यांना मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक म्हणजेच तीन वेळा फिल्म फेअर बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला आहे. तर सात वेळा नॉमिनेशन मिळालं आहे.
अशोक सराफ यांनी एकूण २५० चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे का? ते आतापर्यंत दोन वेळा अपघातातून वाचले आहेत.
अशोक सराफ यांचा आतापर्यंत दोन वेळा अपघात झाला आहे. एकदा १९८८ साली आणि नंतर २०१३ साली त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या अनेक मुलाखतीत त्यांनी हे किस्से सांगितले आहे.