घरी बनवलेलं जेवणही धोकादायक असतं - ICMR

Amit Ujagare (अमित उजागरे)

१) घरी बनवलेले पदार्थ खाणं हे कधीही चांगलं, असा गैरसमज आपण आजवर चांगला म्हणून मान्य करत आलोय.

२) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR) गेल्या आठवड्यात 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांची यादी जाहीर केली आहे, यात हा निष्कर्ष मांडला आहे.

३) जरी घरी शिजवलेल्या अन्नामध्ये मीठ किंवा साखर जास्त असली किंवा चरबी जास्त असली तरी ते पोषक मूल्य कमी आणि उष्मांक जास्त असते.

४) ICMR च्या नोंदीनुसार, सॅच्युरेटेड फॅटमुळं लठ्ठपणाचा धोका वाढतो. तूप किंवा लोणी, खोबरेल तेल, पाम तेल आणि वनस्पती यांसारख्या पदार्थांमध्येही सॅच्युरेटेड फॅट्स असतात.

५) घरी शिजवलेल्या अन्नामध्ये मीठ, साखर, चरबी जास्त असली तर त्यात पोषक मूल्ये कमी आणि उष्मांक जास्त असतो.

६) दररोज 2000-kcal आहारात 10 ग्रॅमपेक्षा जास्त सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं.

७) दररोज मिठाचं सामान्य सेवन दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त नसावं. चिप्स, सॉस, बिस्किटं, बेकरी उत्पादनं तसेच घरगुती सॅवरी स्नॅक्स, नमकीन, पापड आणि लोणचे यामध्ये खूप मीठ असतं.

८) ICMR नं सुचवलंय की, दररोज एकूण साखरेचं सेवन 25 ग्रॅम प्रतिदिन (2000 Kcal) असावं.

९) कॅलरी फक्त तेव्हाच चांगल्या असतात जेव्हा त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात, असंही ICMR नं म्हटलं आहे.