Amit Ujagare (अमित उजागरे)
ई-बाईक टॅक्सीला राज्य सरकारनं हिरवा कंदील दिला आहे.
त्यामुळं आता राज्यातील १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
वाहतूक कोडींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
रस्त्यावरील दुचाकींचं प्रमाण तसंच प्रदुषण कमी करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
या सेवेसाठी पेट्रोल बाईकला परवानगी नाही, फक्त ई-बाईकचं वापरता येणार आहे.
या बाईकवर जीपीएस लावणं बंधनकारक असेल, या बाईकचा वेग मर्यादा तपासली जाईल.
या बाईकवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा आणि चालकाचा वीमा काढला जाईल.
या बाईकच्या चालकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? हे तपासलं जाईल.
या टॅक्सी ई-बाईक्स पिवळ्या रंगांमध्ये रंगवलेल्या असतील.