Amit Ujagare (अमित उजागरे)
१९३४ मध्ये लैंगिक शिक्षणावरून सुरू झालेला एक खटला आणि त्या लढाईत बाबासाहेबांनी घेतली ठाम भूमिका.
र. धों. कर्वेंनी सुरू केलेले ‘समाजस्वास्थ्य’ मासिक हे लैंगिक शिक्षण, हस्तमैथुन, समलैंगिकता यांसारख्या विषयांवर खुलेपणाने चर्चा करणारे होते!
हस्तमैथुन, समलैंगिकता यावर दिलेल्या उत्तरांमुळे ‘समाजस्वास्थ्य’ला अश्लील ठरवण्यात आले. १९३४ मध्ये कर्वेंना अटक झाली.
र. धों. कर्वे ब्राह्मण असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे वकील झाले. हे फक्त वकिलीसाठी नव्हते – यात एक सामाजिक भूमिका होती!
“लैंगिक शिक्षण हे अश्लील नाही, शारीरिक प्रश्नांवर चर्चा करणे हे समाजप्रबोधनाचे एक साधन आहे" अशी ठाम भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती.
कोर्टात विचारणा झाली की, अशा प्रश्नांना उत्तर देण्याचे काय कारण? सनातनी विचारांनी याला विरोध केला.
जे विषय 'वर्ज्य' (टाळले जाणारे) मानले जातात, त्यावरच मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे, असं बाबासाहेबांचं मत होतं.
नैसर्गिक भावना असू शकतात आणि व्यक्तीला त्यातून आनंद घेण्याचा अधिकार आहे, ही व्यक्तिस्वातंत्र्याची बाब आहे, असंही बाबासाहेबांनी म्हटलं.
बाबासाहेबांनी समलैंगिकतेवरील तज्ज्ञ संशोधनांचे दाखले कोर्टात मांडले, हे दाखले त्यावेळेस क्रांतिकारी होते! यामध्ये हॅवलॉक एलिसचा दाखलाही त्यांनी दिला.
१९३४ मध्ये बाबासाहेबांनी घेतलेली भूमिका आजही लैंगिक शिक्षण, व्यक्तिस्वातंत्र्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी मार्गदर्शक आहे.