कोकणचे महाबळेश्वर-दापोलीत या गोष्टींचा नक्की आस्वाद घ्या!

Pranali Kodre

कोकणचे महाबळेश्वर

बाराही महिने अल्हाददायक हवामान, सुंदर समुद्रकिनारे असणारा दापोली तालुका हा कोकणचे महाबळेश्वर म्हणूनही ओळखला जातो.

Dapoli, Ratnagiri, Konkan

|

Sakal

आठ समुद्रकिनारे

दापोली तालुक्याला सुमारे ५० किलोमीटर समुद्रकिनारा असून यात मुरूड, कोळथरे, लाडघर, कर्धे, हर्णे, आंजर्ले, केळशी आणि आडे असे आठ समुद्रकिनारे आहेत.

Dapoli, Ratnagiri, Konkan

|

Sakal

निव्वळ भटकंतीसाठी उत्तम ठिकाण

मुरूड समुद्रकिनाऱ्याला मुरूड-हर्णे समुद्रकिनारा म्हणूनही ओळखले जाते. मऊ वाळू, वाऱ्यावर झुलणारे नारळ, पोफळी, माडाची झाडे, सकाळी दिसणारे सीगल पक्षी लक्ष वेधतात. निव्वळ भटकंतीसाठी हे उत्तम ठिकाण.

Dapoli, Ratnagiri, Konkan

|

Sakal

सरखेल कान्होजी आंग्रे यांचा एकछत्री अंमल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकि‍र्दीत जंजिराचा अपवाग संपूर्ण किनारपट्टीवर हिंदवी स्वराज्याचा भाग होता. दापोलीच्या या किनारपट्टीवर सरखेल कान्होजी आंग्रे यांचा एकछत्री अंमल होता.

Dapoli, Ratnagiri, Konkan

|

Sakal

इंग्रजांचा लष्करी तळ

थंड हवेचं ठिकाण असलेल्या दापोली इंग्रजांच्या नजरेतूनही सुटला नाही. त्यांनी १८१८-१९ दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत दापोलीत लष्करी तळ वसवला होता. त्यामुळे या ठिकाणाला कँप दापोली असंही म्हणतात.

Dapoli, Ratnagiri, Konkan

|

Sakal

पर्यटन स्थळं

दाभोळ बंदर, सुवर्णदुर्ग किल्ला, कनकदुर्ग, फतेदुर्ग, गोवा किल्ला, उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड, कड्यावरचा गणपती, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, महालक्ष्मी मंदिर, साने गुरुजी स्मारक, यातूब बाबा दर्गा असे अनेक पर्यटन स्थळं आहेत.

Dapoli, Ratnagiri, Konkan

|

Sakal

आवर्जून आस्वाद घ्या!

सुर्योदय-सुर्यास्त, कोकणचा मेवा, चौपाटीवरचे पदार्थ, उकडीचे मोदक, आंबपोळी, आंबावडी, काजू, फणस, फणसाच्या पोळ्या, समुद्री मासे, सोलकढी, कोकम सार, कोकम सरबत, मिरगुंडे, तळणीच्या मिरच्या यांचा येथे आवर्जून आस्वाद घ्या.

Dapoli, Ratnagiri, Konkan

|

Sakal

भेट देण्याचा उत्तम कालावधी

हिवाळ्यात, सप्टेंबर ते मे महिन्यादरम्यान, दापोलीत भेट देण्यासाठी उत्तम कालावधी मानला जातो.

Dapoli, Ratnagiri, Konkan

|

Sakal

पर्यटकांनी हेही लक्षात ठेवा

समुद्रकिनाऱ्यावर पाण्याचा अंदाज घेऊनच आनंद घ्या. सुचनांचे पालन करा.

Dapoli, Ratnagiri, Konkan

|

Sakal

कोकणातील मोहक तारकर्ली समुद्रकिनारा! स्कूबा डायव्हिंग, डॉल्फिन दर्शनाचाही घ्या आनंद

Tarkarli Beach, Konkan

|

Sakal

येथे क्लिक करा