Yashwant Kshirsagar
भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वांत मोठी रेल्वेसेवा आहे. देशात रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करतात.
भारतातील काही रेल्वे शेजारी नेपाळ आणि बांग्लादेशमध्ये देखील जातात.
चला तर मग जाणून घेऊया भारतात अशी कोण-कोणती आंतरराष्ट्रीय रेल्वे स्टेशन आहेत, जिथून तुम्ही शेजारच्या देशात स्वस्तात जाऊ शकता.
पश्चिम बंगालमधील हल्दीवाडी रेल्वे स्टेशनवरुन बांग्लादेशात जाण्यासाठी ट्रेन आहे. इथून तुम्ही या शेजारील देशात जाऊ शकता.
जर तुम्ही रेल्वेने नेपाळला जाणार असाल तर बिहारमधील मधुबनी च्या जयनगर स्टेशनवरुन रेल्वेने जाता येईल.
बांग्लादेशात जाण्यासाठी पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील पेट्रोपोल रेल्वे स्टेशनवरुन ट्रेन मिळेल.
बंगालच्या मालदा जिल्ह्यातील सिंगाबाद रेल्वे स्टेशनवरुन देखील बांग्लादेशात जाता येते.
भारत आणि नेपाळच्या सीमेवरील बिहारच्या जोगबनी रेल्वे स्टेशनवरुन नेपाळसाठी ट्रेन आहे. बंगालच्या राधिकापूर रेल्वे स्टेशनवरुन प्रामुख्याने भारत-बांग्लादेशमधील व्यापार होतो.