सकाळ डिजिटल टीम
कोणत्याही डिशमध्ये सुगंध वाढवणे असो किंवा परफ्यूम, हर्बल औषध असो, सर्वत्र एका गोष्टीला खूप मागणी आहे. ज्याला सर्वजण 'केवडा' असं म्हणतात.
केवडा फुलाला जास्त मागणी असल्याने त्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.
केवडा हे हर्बल औषध देखील आहे. घनदाट जंगलात वाढण्यासाठी आणि त्याच्या प्रचंड सुगंधासाठी याला 'फुलांचा राजा' असेही म्हणतात.
केवड्याचा वापर अत्तर, विविध सौंदर्य उत्पादने आणि मिठाई, खाद्यपदार्थांमध्ये केला जातो.
केवड्याची लागवड ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. वास्तविक, हे फूल फक्त समुद्रकिनारी, नद्या, तलाव आणि इतर जलस्रोतांच्या काठावरच वाढते.
शेतकरी बांधवांना कमी वेळेत चांगले पैसे कमवायचे असतील, तर केवडा लागवडीसोबतच केवड्याचे तेल आणि केवड्याचे पाणीही त्यावर प्रक्रिया करून तयार करू शकतात.
कर्करोग, फुफ्फुसात जळजळ, लघवीचे आजार, हृदयविकार, कानाचे आजार, रक्तविकार, डोकेदुखी, त्वचाविकार इत्यादी गंभीर आजारांवर केवडा वापरला जातो.
केवड्याच्या आल्हाददायक सुगंधाने मन आणि शरीराला आराम मिळतो. यामुळे तणाव आणि इतर मानसिक आजारांपासूनही बऱ्याच अंशी आराम मिळतो.