Saisimran Ghashi
सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे हे प्रमाण हल्ली खूप वाढत चालले आहे.
अशात कामावर थकवा जाणवू लागल्यास कामाकडे लक्ष न लागणे, अशक्तपणा वाटू शकतो.
या परिस्थितीमध्ये तुम्ही जवळ काही स्वस्त ड्रायफ्रूट ठेऊ शकता ज्यामुळे थकवा दूर होईल.
काजू हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. तुम्ही रोज थोडे काजू दुधासोबत खा.
तुम्ही काजू सोबत ठेऊ शकता जेणेकरून थकवा जाणवल्यास खावू शकाल.
बेदाणे देखील अन्य ड्रायफ्रूटच्या तुलनेने स्वस्त आहेत.
तुम्ही रोज थोडे थोडे बेदाणे खाल्यास रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते.
बेदाणे खाल्ल्याने थकवा येणे किंवा सतत अशक्तपणा जाणवणे कमी होते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.