फॅटी लिव्हरचा धोका वाढतोय! काय खावे आणि काय टाळावे?

Aarti Badade

फॅटी लिव्हरचा धोका वाढतोय!

फॅटी लिव्हरची समस्या आता तरुण आणि महिलांमध्येही वाढताना दिसत आहे, त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Liver 

| esakal

आहारात भाज्या आणि फळे खा

फॅटी लिव्हरचा त्रास असल्यास पालेभाज्या, ताज्या भाज्या आणि सफरचंद, पपई यांसारख्या फळांचा आहारात समावेश करा.

Fruits to Eat

|

eSakal

डाळी आणि कडधान्ये ठरतील फायदेशीर

मूग, हरभरा, विविध डाळी आणि संपूर्ण धान्ये खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक आणि फायबर मिळते.

liver symptoms

|

Sakal

घरगुती जेवणाला द्या प्राधान्य

बाहेरच्या पदार्थांऐवजी ताजे, कमी प्रक्रिया केलेले आणि संतुलित घरगुती जेवण खाण्यावर भर द्या.

liver symptoms

|

Sakal

तेलकट आणि जंक फूड टाळा

फॅटी लिव्हरचा त्रास असल्यास तळलेले पदार्थ, फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि जास्त तेलकट पदार्थांचे सेवन कमी करा.

liver symptoms

|

Sakal

साखरयुक्त पदार्थांपासून राहा दूर

मिठाई, गोड पदार्थ, शीतपेये आणि अतिरिक्त साखर असलेले पदार्थ खाणे टाळा किंवा त्यांचे सेवन मर्यादित ठेवा.

Liver Inflammation

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे!

फॅटी लिव्हरमध्ये केवळ काय खाता हेच नाही, तर किती खाता हेही महत्त्वाचे असते, त्यामुळे आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Liver 

|

Sakal