Anuradha Vipat
रॅपर बादशाहने देहराडूनमधील एका कॉन्सर्टदरम्यान यो यो हनी सिंगबरोबर त्याचं १५ वर्षांपासून सुरू असलेले भांडण जाहीरपणे मिटवलं आहे
बादशाहने ग्राफेस्ट २०२४ च्या दरम्यान त्याचा परफॉर्मन्स मध्येच थांबवून यो यो बरोबर असलेलं भांडण सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
बादशाहचा कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे
यामध्ये बादशाह म्हणताना दिसत आहे की, मी एका व्यक्तीच्या विरुद्ध राग बाळगला होता. पण, आता मला तो राग पाठीमागे सोडून द्यायचा आहे आणि ती व्यक्ती म्हणजे हनी सिंग.
पुढे बादशाह म्हणताना दिसत आहे की, काही गैरसमजामुळे आम्ही दोघं वेगळे झालो. त्यामुळे आज मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी तो राग मागे सोडला आहे आणि मी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे
या दोघांनी भांडणानंतर दोघं वेगळे झाले आणि सोशल मीडियावर नियमितपणे एकमेकांबद्दल टीका केली आहे.
बादशाहच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर बादशाह आणि हनी सिंगच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.