BMW च्या दरवाजात बोट अडकलं अन् नशीब फळफळलं! झाला कोटींचा फायदा..

Saisimran Ghashi

जर्मन कार निर्माता कंपनी BMW ला कोर्टाने ग्राहकास 1.9 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 15 कोटी 86 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

कारच्या दारात त्रुटी

BMWवर आरोप होता की त्यांच्या X5 कारच्या दरवाज्यात असलेल्या त्रुटीमुळे कार चालवणाऱ्या मालकाला अंगठा गमवावा लागला.

सॉफ्टवेअर इंजिनियर सोबत घटना

ही घटना जुलै 2016 मध्ये घडलेली जेव्हा न्यूयॉर्कमध्ये राहणारे सॉफ्टवेअर इंजिनियर गॉडविन बोटिंग त्यांच्या BMW X5 च्या ड्रायव्हर साइड दरवाजाच्या किनाऱ्यावर हात टेकून होते.

सॉफ्ट क्लोज डोअर

या कार कंपनीने सॉफ्ट क्लोज डोअर दिले आहे ज्याला अशाप्रकारे डिझाईन केले जाते की कोणत्याही ऑब्जेक्टला सेन्स केल्यावर दरवाजे आपोआप क्लोज होत नाहीत.

दरवाज्यात तांत्रिक बिघाड

परंतु गॉडविन बोटिंग यांचे म्हणणे होते की त्यांच्या कारच्या दरवाज्यात काहीतरी तांत्रिक बिघाड होता ज्याच्यामुळे सॉफ्ट क्लोज डोअर सिस्टीम काम न केल्याने त्यांचा अंगठा तुटला.

उजव्या हाताचा अंगठा तुटला

रिपोर्टनुसार गॉडविन बोटिंग यांनी उजवा हात बीएमडब्ल्यू एक्स 5 च्या किनाऱ्यावर ठेवला होता घटनेच्या वेळी दरवाजा एवढा जलद बंद झाला की त्यांना तिथून हात काढण्याची संधीच मिळाली नाही.

अंगठा जोडता आला नाही

दरवाजा एवढ्या जलद गतीने बंद झाला की त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा वरचा भाग पूर्णपणे तुटला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर देखील हा तुटलेला भाग जोडता आला नाही.

आठ वर्षे कायद्याची लढाई

आठ वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईमध्ये ते नुकसान भरपाई मागत होते. परंतु कंपनीच्या चाचणी दरवाजात कोणतीही त्रुटी आढळली नाही.

16 कोटींची भरपाई

कोर्टाने बीएमडब्ल्यू कंपनीला अशी सूचना दिली आहे की त्यांनी नुकसान भरपाई म्हणून 1.9 मिलियन अमेरिकन डॉलर कार मालकाला द्यावे.

आर्थिक स्थितीवर परिणाम

गॉडविन बोटिंग यांनी दावा केला होता की त्यांचा अंगठा कट झाल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्यांच्या कामावर परिणाम झाला आहे यामुळे दरवर्षी त्यांना 2.8 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

कार मॅन्युअलमधील चेतावनी

तरी जर्मन कार कंपनीने तर्क दिला आहे की कार मॅन्युअल मध्ये दरवाजा आणि फ्रेम याच्यामध्ये शरीराचा कोणताही अंग ठेवण्याच्या विरोधात चेतावणी दिली गेली आहे तरीही कोर्टाने बोटिंग यांच्या पक्षात निर्णय दिला आहे.

आतापर्यंत हे निश्चित झाले नाही की बीएमडब्ल्यू कोर्टाच्या निकाला विरोधात अपील करणार आहे की नाही.

बॉलीवुडचे 'हे' 5 सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तुम्हाला करतील शॉक