भारताचा पहिला खासगी हेरगिरी उपग्रह.. का आहे खास?

Sudesh

हेरगिरी उपग्रह

भारतात खासगी कंपनीने तयार केलेला पहिला हेरगिरी उपग्रह आता प्रक्षेपणासाठी सज्ज झाला आहे.

India Spy Satellite | eSakal

टाटा

टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेडने (TASL) या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.

India Spy Satellite | eSakal

स्पेस-एक्स

विशेष म्हणजे, स्पेस एक्सच्या रॉकेटमधून याचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासाठी हा उपग्रह फ्लोरिडाला नेण्यात येईल.

India Spy Satellite | eSakal

बंगळुरू

या उपग्रहासाठी ग्राउंड कंट्रोल सेंटर हे बंगळुरूमध्ये उभारण्यात येत आहे. हे लवकरच कार्यरत होईल.

India Spy Satellite | eSakal

वापर

या उपग्रहाचा वापर गोपनीय माहिती मिळवण्यासाठी सैन्याकडून केला जाणार आहे. यापूर्वी आपल्या सैन्याला जमीनीवरील कोओर्डिनेट्स आणि वेळेची अचूक माहिती मिळवण्यासाठी विदेशी उपग्रहांवर अवलंबून रहायला लागत होतं.

India Spy Satellite | eSakal

फायदा

स्वदेशी उपग्रहामुळे भारत स्वतःच मॉनिटरिंग करू शकणार आहे. यामुळे सैन्याला पूर्ण ग्राउंड कंट्रोल मिळणार आहे. TASL उपग्रहाने दिलेली माहिती ही भारत आपल्या मित्र राष्ट्रांना देखील पुरवणार आहे.

India Spy Satellite | eSakal

गरज

भारत सध्या हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेतील कंपन्यांच्या उपग्रहांची मदत घेतो आहे.

India Spy Satellite | eSakal

चीन

चीन सीमेवर सातत्याने होत असलेल्या वादामुळे स्वदेशी हेरगिरी उपग्रहाची गरज आणखी प्रखरतेने जाणवत आहे. अशात हा उपग्रह भारताला फायद्याचा ठरणार आहे.

India Spy Satellite | eSakal

इस्रोची मोठी कामगिरी; हायटेक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण!

ISRO INSAT-3DS | eSakal