Saisimran Ghashi
आंबा हे फळ प्रत्येकाला आवडते. त्याच्यासाठी आपण वर्षभर वाट पाहतो.
फळांचा राजा अशी ओळख असलेला यंदाच्या सिझनमधील पहिला आंबा हा पुण्यातील मार्केटयार्ड येथे दाखल झाला आहे.
दरवर्षी देवगड येथून हापूस हा मार्केटयार्ड येथे दाखल होत असतो.
पण यंदा देवगड येथील साद मुल्ला या शेतकऱ्याकडून केसर या आंब्याची पेटी ही मार्केटयार्ड येथे दाखल झाली
आज झालेल्या लिलावात सव्वा पाच डझन च्या पेटीला तब्बल ३१ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.
मार्केटयार्ड येथील व्यापारी तसेच संचालक बापू भोसले यांच्या गाळ्यावर आज देवगड येथील साद मुल्ला या शेतकऱ्याकडून केसर या आंब्याची पेटी ही दाखल झाली
भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा मिसाळ तसेच विविध व्यापाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या लिलावात रावसाहेब कुंजीर यांनी ३१ हजार रुपयांत सिझन मधील पहिल्या आंब्याची पेटी खरेदी केली आहे.