Amit Ujagare (अमित उजागरे)
सरला ठकराल या भारताच्या पहिल्या महिला पायलट होत्या. त्यांचा जन्म १९१४ झाला होता, वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना विमान चालवण्याचा परवाना मिळाला. ब्रिटिश इंडियात त्यांनी कराची ते लाहोर मार्गावर पहिल्यांदा उड्डाण केलं होतं.
कल्पना चावला भारतात जन्मलेल्या 'या' पहिल्या महिला अंतराळवीर होत्या. 17 मार्च 1962 रोजी कर्नाल इथं त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी अॅस्ट्रॉनॉटिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. १९९४ मध्ये अमेरिकेच्या नासामध्ये कामाला सुरुवात केली.
आनंदीबाई गोपाळ जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या, वेस्टर्न मेडिसिनमध्ये डिग्री घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. ३१ मार्च १८६५ ला त्यांचा जन्म झाला होता. त्या अशा काळात डॉक्टर झाल्या ज्यावेळी महिलांना प्राथमिक शिक्षण घेणंही अवघड होतं.
हंसा मेहता भारताच्या पहिल्या महिला कुलगुरु होत्या. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबईच्या त्या कुलगुरु होत्या. १५ जुलै १९६२ रोजी त्यांचा जन्म सोवित रशियातील लेनिनगार्ड इथं झाला होता.
पहिल्या महिला शिक्षिका
भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सावित्रीबाईंनी पुण्यातील भिडे वाडा इथं १ जानेवारी १८४८ सुरु केली. या शाळेच्या त्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिकाही होत्या. सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला होता.
पहिल्या महिला फायटर पायलट
अवनी चतुर्वेदी, मोहना सिंग, भावना कांत या तीन महिला भारतातील पहिल्या महिला फायटर पायलट आहेत. भारत सरकारनं हवाई दलात महिलांचा विंग तयार करण्याचा निर्णय ऑक्टोबर २०१५ रोजी घेतला. त्यावेळी या तीन महिलांना पहिल्या फायटर पायलट व्हायचा मान मिळाला.
पहिल्या महिला IPS
किरण बेदी या भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी पुढे पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल म्हणून कामही पाहिलं. ९ जून १९४९ रोजी त्यांचा जन्म झाला.
पहिल्या महिला न्यायाधिश
अन्ना चांडी या भारताच्या पहिल्या महिला न्यायाधिश आहेत. सन १९३७ मध्ये त्या जिल्हा कोर्टात न्यायाधिश बनल्या. तसंच हायकोर्टाच्या महिला न्यायाधिश होणाऱ्या महिलांमध्ये (१९५९) त्या दुसऱ्या स्थानी आहेत.
पहिल्या महिला पत्रकार
विद्या मुंशी, होमई व्यारवाला या दोन महिला भारतातील पहिल्या महिला पत्रकार आहेत. विद्या मुंशी या पत्रकार आणि कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या होत्या. तसंच होमई या फोटो जर्नलिस्ट होत्या, १९३० मध्ये बॉम्बे क्रॉनिकलसाठी त्या काम करत होत्या.
पहिली महिला ऑलिम्पिकविजेती
कर्नम मल्लेश्वरी या भारतातील पहिल्या महिला ऑलिम्पिकपदक विजेत्या आहेत. २००० मध्ये त्यांनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.