Amit Ujagare (अमित उजागरे)
ऑलिम्पक पदकं विजेती भारताची नेमबाज मनू भाकर हिनं आपल्या फिटनेसचं रहस्य आणि महत्व सांगितलं आहे.
'फिट है तो हिट है' या घोषवाक्याचा उच्चार करताना तिनं फिटनेस का महत्वाचं आहे हे सांगितलं आहे.
जर आपण फीट राहिलो तर जीवनात बऱ्याच गोष्टी आपण करु शकतो. फिटनेसशिवाय मोठं दुसरं काहीही नाही, असही ती म्हणते.
सात्विक अन्न आणि रुटीन फॉलो करणं हे महत्वाचं आहे, आपल्या देशात हे पूर्वीपासून होत आहे.
आपण पूर्वी नेहमी शेतात काम करायचो तर किती कणखर होतो. शारिरीकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या देखील.
दररोजच्या धावपळीत आपण यासाठी थोडा वेळ तर काढूच शकतो, यामुळं आपण आजारांना दूर ठेऊ शकतो आणि आरोग्यकारकही राहू शकतो.
खेळाडू म्हणून आम्हाला व्यायामासाठी वेळ काढावा तर लागतोच. आम्हाला आमच्या आरोग्यासाठी देखील ते महत्वाचं आहे.
तुम्ही देखील सकस अन्न घ्या आणि आरोग्यपूर्ण लाईफस्टाईलचा स्विकार करा, असं आवाहनही तिनं केलं आहे.