Anushka Tapshalkar
हिवाळा सांध्यांच्या दुखण्यासाठी त्रासदायक ठरू शकतो, विशेषतः जर तुम्हाला संधिवात किंवा इतर सांध्यांचे आजार असतील. त्यामुळे हे दुखणे कमी करण्यासाठी पुढे दिलेले उपाय नक्की अवलंबा.
थंडीत सांध्यांना उबदार ठेवण्यासाठी २-३ थरांमध्ये कपडे घाला आणि गरम कपडे वापरा. हीटिंग पॅड्स किंवा गरम ब्लँकेटचा वापर करा जेणेकरून शरीराचे तापमान संतुलित राहील.
हलका व्यायाम, जसे की चालणे, योगा किंवा स्ट्रेचिंग, रक्ताभिसरण सुधारते आणि सांध्यांचा स्टिफनेस कमी करते.
जास्त वजन सांध्यांवर दबाव टाकते, विशेषतः गुडघ्यांवर. संतुलित आहार आणि नियमित व्यायामाने वजन नियंत्रित ठेवा आणि सांध्यांवरील ताण कमी करा.
थंडीत तहान कमी लागते, पण सांधे ताठर होऊ नयेत म्हणून शरीराला पुरेसे पाणी द्या. भरपूर पाणी आणि हर्बल टी प्या.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन डी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध पदार्थ, जसे की मासे, सुकामेवा, बिया, आणि हिरव्या पालेभाज्या आहारात समाविष्ट करा.
गुडघ्यांना, हातांना किंवा पायांना थंडीतून वाचवण्यासाठी जॉईंट सपोर्टर्स, योग्य चप्पल किंवा हातमोजे वापरा. याव्यतिरिक्त हिट पॅड्सचाही चांगला फायदा होतो.
आयुर्वेदानुसार तीळ किंवा मोहरीचे तेल सांधेदुखीसाठी फायदेशीर असते.
त्यामुळे त्यामुळे यापैकी कोणतेही तेल थोडेसे गरम करून हलक्या हाताने मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि सांध्यांचा स्टिफनेस कमी होतो.
व्हिटॅमिन डी हाडांच्या मजबूतासाठी महत्त्वाचे असते, त्यामुळे सकाळी थोडा वेळ उन्हात बसा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.