Anushka Tapshalkar
नवीन वर्ष हे नवीन ध्येय ठरवण्यासाठी एक उत्तम संधी असते. म्हणून बरेचजण नवीन वर्षी काही संकल्प करतात.
परंतु त्यापैकी अनेक जणांना हे संकल्प टिकवून ठेवणे अवघड जाते. त्यासाठी पुढे काही टिप्स दिल्या आहेत, त्या फॉलो केल्या तर तुम्ही तुमची ध्येय आणि उद्दिष्ट नक्की पूर्ण करू शकता.
जी सहज साध्य करता येतील अशी आणि वास्तविक शक्य असतील अशी उद्दिष्टे ठरवा. जसेकी तुम्हाला जर वजन कमी करायचे आहे तर रोज मी लिफ्ट ऐवजी जीन्याचा वापर करेन असे म्हणा.
तुम्ही ठरवलेले संकल्प लिहून काढा आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे ते तुम्हाला रोज दिसतील. उदा. भिनीतवर, डायरीत किंवा तुमच्या फोनच्या नोट्समध्ये.
तुम्ही केलेले संकल्प कसे साध्य कराल, ते आधी ठरवा. प्रत्येक संकल्प त्याहून लहान आणि साध्य करण्यायोग्य भागात विभागा. यामुळे तुम्ही तुमचे संकल्प सहजतेने पूर्ण करू शकता.
वेळोवेळी तुम्ही तुमच्या ध्येयाच्या किती जवळ किंवा लांब आहात याचा सतत मागिव घेत राहा. यामुळे तुम्हाला कुठे बदल करणे गरजेचे आहे हे कळते.
सुरुवात साधी ठेवा. एकावेळी जास्त गोष्टींचा भर घेऊ नका. त्याऐवजी एका वेळी एक गोष्ट केली तर तुम्हाला तुमचे ध्येय सुरळीतपणे गाठता येईल.
मित्र किंवा कुटुंबीयांसोबत संकल्प शेअर करा. ते तुमचं लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आणि तुम्हाला प्रेरित करण्यासाठी मदत करू शकतात.
प्रत्येक टप्पा गाठला की स्वतःला शाबासकी द्या. जसे की तुमचा आवडता खाऊ, एक लहानशी सहल किंवा फक्त स्वतःसाठी वेळ.
जर काही दिवस चुकले तर स्वतःला दोष देऊ नका. त्याऐवजी, परत सुरुवात करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.