सकाळ डिजिटल टीम
थंडी जशी जशी वाढते आणि तापमान कमी होते तसे शरीराला ऊष्ण ठेवणे कठीण होते. पण काही सोप्या पद्धतींनी शरीर ऊबदार ठेवणे सोपे आहे.
सर्वात आधी थर्मल इनेर वेअर घालावे ज्यामुळे शरीराची उष्णता टिकून राहते. त्यावर एखादे स्वेटर, वूलनची टोपी, आणि हातमोजे घातले तर थंडी कमी वाजते आणि शरीर ऊबदार राहते.
थंड पेय टाळा. त्याऐवजी गरम पेय जसे की चहा,कॉफी, काढा, हॉट चॉकलेट याना प्राधान्य द्यावे.
हिवाळ्यात आपल्या घरातील फारशी देखील थंड पडते. त्यामुळे वूलनचे सॉक्स घालणे एक उत्तम उपाय आहे.
शारीरिक हालचालींमुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी काही हलके व्यायाम,चालणे किंवा स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करा.योगा करणे हा शरीर उष्ण ठेवण्यासाठीचा एक उत्तम आणि प्रभावी उपाय आहे.
जर गरम कपडे घालूनही तुम्हाला थंडी वाजत असेल तर एखादी गरम पाण्याची बाटली किंवा हॉट वॉटर बॅग तुमच्या मांडी ठेवली किंवा झोपताना जवळ घेतली तर लगेच ऊब मिळू शकते.
थंड हवा हि दाराच्या फटीतून किंवा दाराच्या खालच्या बाजूने घरात प्रवेश करू शकते. त्यासाठी एखादा टॉवेल गुंडाळून दाराच्या खाली ठेवल्यास थंड हवा आत येणार नाही.
जसे उन्हाळ्यात थंडाई साठी ए/सी किंवा कूलर वापरतात तसे हिवाळ्यात हीटर वापरल्याने घरात ऊबदार वातावरण तयार होते व तुम्हाला थंडीही वाजत नाही.