उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'हे' खाद्यपदार्थ

Monika Lonkar –Kumbhar

बिघडलेली जीवनशैली

सध्याचे धावपळीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. 

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब ही त्यापैकीच एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे, आजकाल अनेक लोक त्रस्त आहेत.

हृदयविकार

उच्च रक्तदाबामुळे तुम्हाला भविष्यात हृदयविकार होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे, वेळीच या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आहार

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता. या खाद्यपदार्थांमुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकेल.  

हिरव्या पालेभाज्या

पालक आणि मेथीमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचे मुबलक प्रमाण आढळते. त्यामुळे, या भाज्यांचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. 

टोमॅटो

टोमॅटो आणि टोमॅटो आधारित खाद्यपदार्थांमध्ये पोटॅशिअम, कॅरोटीनॉईड आणि लाईकोपीनचे प्रमाण आढळते. जे आपले हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर आहे. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाला हानिकारक ठरणाऱ्या घटकांचा धोका ही कमी होतो. 

सॅलमन

सॅलमनमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळून येते. ज्यामुळे, हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. शिवाय, सॅलमनचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकते.

मराठमोळी थोडीशी साधीभोळी..!अप्सरेचा निळ्या पैठणीतला दिलखुलास अंदाज