चांगल्या कॉलेस्ट्रॉलसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, हृदय राहील निरोगी

Monika Lonkar –Kumbhar

हृदय

निरोगी हृदयासाठी आपल्या शरिरात कॉलेस्ट्रॉलची पातळी व्यवस्थित असणे गरजेचे आहे. 

Good Cholesterol

कॉलेस्ट्रॉल

हे चरबीसारखे आहे, जे शरीरात योग्य प्रमाणात असल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत करते. जर शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Good Cholesterol

खाद्यपदार्थ

विशेष म्हणजे यकृत जरी शरीरात कॉलेस्ट्रॉलची निर्मिती करत असले, तरी आपल्या खाण्यापिण्यातूनही कॉलेस्ट्रॉल शरीरात प्रवेश करते.

Good Cholesterol

चांगला आहार

निरोगी राहण्यासाठी चांगले कॉलेस्ट्रॉल हे आवश्यक असते. या चांगल्या कॉलेस्ट्रॉलसाठी तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. या पदार्थांमुळे शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल तयार होण्यास मदत होते. 

Good Cholesterol

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. या डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. 

Good Cholesterol

हे डार्क चॉकलेट आपल्या शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु, याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. चांगल्या कॉलेस्ट्रॉलसाठी तुम्ही आहारात डार्क चॉकलेटचा समावेश करू शकता. 

Good Cholesterol

बेरीज

बेरीजमध्ये विविध प्रकार पहायला मिळतात. यामध्ये ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरीचा समावेश असतो. या बेरीजमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. जे आपल्या शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात.

Good Cholesterol

फॅटी फिश

सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन सारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण भरपूर असते. हे  फॅटी अ‍ॅसिड आपल्या शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात.

Good Cholesterol

लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आलाय? मग, आहारात 'या' होममेड ज्यूसचा करा समावेश

Iron Deficiency | esakal