Gokak Falls : चक्क गोकाक धबधबा उन्हाळ्यात प्रवाहित; 'हिडकल'मधून सोडले 4000 क्युसेक पाणी

सकाळ डिजिटल टीम

गोकाक : घटप्रभा नदी कोरडी पडल्याने जनतेला व जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती.

Gokak Falls in Belgaum Karnataka

ही समस्या दूर करण्यासाठी बेळगाव प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशाद्वारे सोमवारी (ता. १९) रोजी हिडकल जलशयातून चार हजार क्युसेक पाणी सोडले आहे.

Gokak Falls in Belgaum Karnataka

त्यामुळे गोकाक धबधब्यावरून पाणी कोसळत असून धबधबा प्रवाहित झाला. ऐन उन्हाळ्यात धबधबा प्रवाहित होऊन निसर्ग सौंदर्य खुलले आहे.

Gokak Falls in Belgaum Karnataka

बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील जनतेने अलीकडे सार्वजनिक बांधकाम तथा बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन जलाशयातून पाणी सोडण्याची विनंती केली होती.

Gokak Falls in Belgaum Karnataka

नदीद्वारे दोन टीएमसी व घटप्रभा उजव्या कालव्याद्वारे दोन टीएमसी असे घटप्रभा नदीत चार हजार क्युसेक पाणी प्रवाहित झाले आहे.

Gokak Falls in Belgaum Karnataka

सध्या हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयात ३०.४६ टीएमसी पाणीसाठा असून, गतवर्षी याच काळात २३.१६ टीएमसी साठा होता.

Gokak Falls in Belgaum Karnataka

यंदा हिडकल जलाशय पाणलोट क्षेत्रात पुरेशा पावसाअभावी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले नाही.

Gokak Falls in Belgaum Karnataka

'ही' आहेत जगातील 7 नैसर्गिक आश्चर्ये, जी तुम्हाला पाहायला नक्कीच आवडतील!