सकाळ डिजिटल टीम
आजकाल मखाणा वेट लॉस डाएटमध्ये एक आवश्यक घटक बनला आहे. वजन कमी करण्यासाठी लोक मखाणाचा समावेश करतात.
मखाण्यासाठी कमळाची बीजे वापरली जातात. त्या बिया पाण्यात भिजवल्या जातात आणि स्वच्छ धुतल्या जातात.
साधारणपणे तीन ते चार वेळा बीजे धुतली जातात. नंतर त्या बिया सुकवल्या जातात.
सुकवलेली बीजे कढईत गरम केली जातात. त्या नीट परतून घेतल्यावर मखाणाचा बाहेरील आवरण निघून जातो आणि मखाणा तयार होतो.
मखाणा बनवण्यासाठी खूप कष्ट घेतले जातात. या प्रक्रियेत अनेक लोकांची मेहनत असते.
भारताच्या बिहार राज्यात मखाणे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मखाणा भारताबाहेर कोरिया, जपान, रशिया इत्यादी देशांमध्ये देखील तयार केला जातो.
मखाणा कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. तो वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.