Yashwant Kshirsagar
राळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. हे सर्व गुणधर्म बघता राळ्याचा नियमित वापर आहारामध्ये होणे गरजेचे आहे.
राळ्याचा ग्लायसेनिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यासाठी त्याचा आहारात नियमित वापर होणे आवश्यक आहे.
मधुमेह आणि पोटाच्या आजारांवर राळा हे पौष्टिक अन्न म्हणून वापरता येते.
राळा दाण्याचा ७९ टक्के भाग हा पाचक असतो. उर्वरित भागामध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असून ते पोट साफ होण्यास मदत करतात. त्यामुळे त्याचा उपयोग पाचक पदार्थांमध्ये जास्त होतो.
राळा हे ग्लुटेन विरहित असल्याने ते पचायला हलके असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते.
राळ्यामधे अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म जास्त असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यावरच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर केला जातो.
राळ्यामधे कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. हाडांची ठेवण, मजबूतपणा राखण्यास राळा उपयोगी आहे. मोड आलेले राळे खाल्यास हाडांचा ठिसूळपणा तसेच फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण कमी होते.
यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ते मेंदूला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवते. तसेच मेंदूची वाढ व कार्यक्षमता सुरळीत ठेवते.