Aarti Badade
ब्रिटीश राजवटीपासून मुक्त होण्यासाठी भारताने जवळपास 200 वर्षे संघर्ष केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी हा लढा विजयात संपला.
पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश व्यापाऱ्यांनी भारतात प्रवेश केला. 1757 नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व वाढले.
मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांसारख्या वीरांनी उठाव केला. जरी तो अपयशी ठरला तरी स्वातंत्र्याची ठिणगी पेटली.
1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. याला विरोध म्हणून स्वदेशी चळवळ सुरू झाली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आला.
लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल यांनी जनतेत स्वातंत्र्याची भावना जागवली. स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता, दादाभाई नौरोजी यांचेही मोलाचे योगदान.
दांडी मार्च, असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह यांच्या माध्यमातून गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवला.
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी शौर्य आणि बलिदानाची अद्वितीय उदाहरणे घालून दिली.
"करो या मरो" या घोषणेसह लाखो भारतीय रस्त्यावर उतरले. या आंदोलनाने ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला.
14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानची निर्मिती झाली आणि 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र व सार्वभौम झाला. तिरंगा अभिमानाने फडकला.
स्वातंत्र्यलढा ही केवळ इतिहासाची गोष्ट नाही, तर प्रत्येक पिढीसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.