Aarti Badade
भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचे कुन्नूर (तामिळनाडू) येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांच्यासह पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे पवन हंस हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. ५ दिवसांनी अवशेष सापडले.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YSR रेड्डी यांचे नल्लामला जंगलात हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले. खराब हवामान हे कारण.
हरियाणाचे मंत्री जिंदाल आणि सहकारी सुरेंद्र सिंग यांचे हेलिकॉप्टर सहारनपूरजवळ कोसळले. दोघांचाही मृत्यू झाला.
दक्षिण भारतीय अभिनेत्री सौंदर्या यांचे निवडणूक प्रचारासाठी जाताना विमान अपघातात निधन झाले.
लोकसभा अध्यक्ष बालयोगी यांचे हेलिकॉप्टर आंध्र प्रदेशात कोसळले. ते १२ वे लोकसभा स्पीकर होते.
माजी रेल्वेमंत्री माधवराव सिंधिया यांचे विमान कानपूरजवळ कोसळले. अपघाताचे कारण खराब हवामान.
सफदरजंग विमानतळावर काँग्रेस नेते संजय गांधी यांचे वैयक्तिक विमान कोसळले. धोकादायक स्टंट करताना अपघात झाला.
इंडियन एअरलाइन्स फ्लाइट ४४० च्या अपघातात माजी खासदार सुरेंद्र मोहन यांचे निधन झाले. ओळख श्रवणयंत्रावरून पटली.
अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांचे मॉंट ब्लँक (स्वित्झर्लंड) येथे विमान अपघातात निधन. अणुऊर्जेच्या भारताच्या वाटचालीस मोठा धक्का.
पूंछ अपघातात भारतीय लष्करातील ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर नवीन जलकुंभ पाहणीसाठी जात असताना कोसळले.
एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनर विमानाचा अपघात अहमदाबादमधील मेघाणीनगर येथे झाला. २४२ प्रवासी असलेल्या या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी होते. या भीषण दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.