Aarti Badade
केळीच्या सालीत फायबर, व्हिटॅमिन B6 आणि C भरपूर प्रमाणात असते, जे पचनासाठी फायदेशीर ठरते.
केळीची साल पाण्यात उकळून प्यायल्यास पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
केळीची साल केसांवर चोळल्याने केसांची वाढ सुधारते आणि केस मजबूत होतात.
केळीची साल चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मऊ, तजेलदार आणि हायड्रेटेड राहते.
केळीची साल दातांवर घासल्याने दातांवरील पिवळसरपणा कमी होतो आणि संसर्ग नियंत्रणात राहतो.
केळी आणि त्याची साल दोन्ही पचन सुधारून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
सालाच्या नियमित वापरामुळे अतिसार, गॅस व बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात.