सकाळ डिजिटल टीम
फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. कारण, त्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.
असे बरेच लोक आहेत, ज्यांना फळे खायला आवडत नाहीत आणि ते सर्व फळांचा रस पितात; पण फळे खाण्यापेक्षा ज्यूस पिणे हेल्दी आहे का?
बहुतेक आरोग्य तज्ञ सांगतात, की फळे खाण्यापेक्षा रस पिणे आरोग्यदायी नाही. याचं कारण असं, की जेव्हा तुम्ही कोणत्याही फळाचा रस बनवता, तेव्हा त्या फळातील संपूर्ण फायबर बाहेर पडते. त्यानंतर रसात फक्त पाणी आणि साखर राहते.
फळे मुबलक प्रमाणात फायबर देतात, परंतु आपण ते पूर्ण खाल्ल्यासच आपल्याला हे मिळू शकते. आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी फळांमध्ये असलेले फायबर खूप महत्त्वाचे असते.
याशिवाय, फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात.
जेव्हा तुम्ही फळांचा रस पिता, तेव्हा त्यात असलेली साखर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते. त्याचा रस प्यायल्याने त्यातील सर्व फायबर बाहेर पडतात आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू लागते.
अननसात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. यामध्ये व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, कॉपर, फायबर असतात. तुम्ही ते पूर्ण खावे. त्याचा रस प्यायल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.
रोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, मँगनीज आढळतात. मात्र, त्याचा रस काढून पिण्याची चूक करू नका.