दहावी-बारावीनंतर कुठल्या कोर्सला चांगली मागणी? पगारही मिळेल चांगला

Amit Ujagare (अमित उजागरे)

इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. यापुढील काळात कुठले कोर्सेस करावेत जेणे करुन चांगला रोजगार उपलब्ध होईल हे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होतात.

Career Option

तर असे कुठले कोर्स आहेत जे तुम्हाला चांगला पगार मिळवून देऊ शकतात. तसंच पुढील पाच वर्षात कुठल्या क्षेत्राला मागणी राहील, याचा आढावा घेऊयात.

Career Option

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग हा बारावीनंतर चांगला पर्याय आहे. कारण सध्या ऑनलाईन खरेदीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यामुळं या कोर्समध्ये ऑनलाईन मार्केटिंगच्या रणनीतीबाबत शिकवलं जातं. यामध्ये एसईओ, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, डिजिटल जाहीरात याबाबत शिकवलं जातं.

Career Option

कृत्रीम बुद्धिमत्ता

कृत्रीम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा एक भविष्यात नोकरीसाठीचा चांगला पर्याय असणार आहे. यामध्ये मशिन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, कॉम्प्युटर व्हिजन, रोबोटिक्स यांसारखे विषय शिकता येतात. या क्षेत्राला खूप स्कोप असल्यानं पगारही चांगले मिळू शकतात.

Career Option

प्रवास व पर्यटन व्यवस्थापन

प्रवास व पर्यटन व्यवस्थापन क्षेत्रात करियरच्या मोठ्या संधी आहेत. यामध्ये हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन, टूर ऑपरेशन, ट्रॅव्हल एजन्सीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात चांगला पैसा कमावता येऊ शकतो.

Career Option

सायबर सुरक्षा

सायबर सुरक्षा विषयक कोर्स हा एक असा अभ्यासक्रम आहे. जो कॉम्प्युटर सिस्टिम आणि नेटवर्कला सायबर धोक्यांपासून वाचवतो. मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन व्यवहार वाढल्यानं त्यात फसवणुकीचं प्रमाणही वाढलं आहे. यामध्ये नेटवर्क सुरक्षा, एथिकल हॅकिंग, क्रिप्टोग्राफी, डिजिटल फॉरेन्सिक हे विषय येतात.

Career Option

फॅशन डिझाईनिंग

फॅशन डिझाईनिंग एक कलात्मक आणि रचनात्मक क्षेत्र आहे. या क्षेत्रात तुम्ही कपड्यांच्या डिझाईन्स तयार करुन स्वतंत्ररित्या कपडे तयार करुन विकू शकता किंवा चित्रपटसृष्टीतही याला मोठी मागणी आहे. यामध्ये तुम्ही चांगले पैसे कमावू शकता.

Career Option

डाएटिंग आणि न्यूट्रिशन

डाएटिंग आणि न्यूट्रिशन या क्षेत्रातही चांगल करियर तुम्ही करु शकता. लोकांची बदललेली जीवनशैलीमुळं त्यांचं खाण्यापिण्यावर नियंत्रण राहिलेलं नाही. त्यामुळं चांगल्या आरोग्यासाठी त्यांना सल्ला देणं, गाईड करणं महत्वाचं ठरतं. यासाठी तुम्ही वैयक्तिक गाईड म्हणून काम करु शकता, तसंच जिमसाठी देखील काम करु शकता.

Career Option