Pranali Kodre
गाथासप्तशती हा मराठी भाषेतील उपलब्ध असलेला सर्वात जुना ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात सातवाहन काळातील लोककविता संग्रहित केल्या आहेत.
‘गाथा’ म्हणजे कविता. गाथासप्तशती हा प्राचीन मराठी कवितांचा संग्रह आहे, जो तत्कालीन लोककवितांचा ठेवा मानला जातो.
सातवाहन राजांच्या काळात मराठी भाषा विकसित झाली. त्यांच्या आश्रयामुळे गाथासप्तशतीसारखे ग्रंथ निर्माण झाले.
या ग्रंथातील कविता सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या असून त्या प्राचीन भारतीय साहित्याचा महत्त्वाचा भाग आहेत.
सातवाहन राजांची राजभाषा मराठी होती. त्या काळातील विविध ठिकाणी या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती आढळून आल्या आहेत.
सातवाहनांचे साम्राज्य संपूर्ण भारतभर पसरले होते. त्यांच्या राजवटीत मराठी भाषेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
सातवाहन काळात मराठी भाषा अफगाणिस्तानपर्यंत पोहोचली होती. त्या काळात मराठीचा झेंडा मोठ्या भूभागावर फडकत होता.
आजही गाथासप्तशती हा मराठी भाषेच्या प्राचीनतेचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज मानला जातो. मराठी भाषेच्या समृद्ध वारशाची साक्ष हा ग्रंथ देतो.
कुठे सापडली होती छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मकुंडली?