Sandip Kapde
गौतमी पाटील ही सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली लावणी कलाकार आहे.
तिचे जुने फोटो समोर आल्याने अनेकांना धक्का बसला – "हीच का ती गौतमी?" असा प्रश्न अनेकांनी विचारला.
तिचे डान्स व्हिडिओ प्रेक्षकांना अत्यंत भावतात आणि व्हायरलही होतात.
सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंमध्ये आहे.
विशेषतः तरुणांमध्ये गौतमीची क्रेझ प्रचंड आहे.
लावणीच्या कार्यक्रमांतून तिने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
तिचा आण्णा नाईकसोबतचा ‘बाई वाड्यावर’ लावणी डान्स सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
तिचे अनेक व्हिडिओज इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर सतत व्हायरल होत असतात.
गौतमीचा जन्म धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावात झाला.
तिच्या वडिलांनी लवकरच आईला सोडल्यामुळे ती आजोळी मोठी झाली.
तिचं कुटुंब पुण्यात उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालं.
आईने छोटी-मोठी कामं करून घर चालवलं.
एकदा तिच्या आईचा PMT बसमधून अपघात झाला आणि त्या काम करू शकल्या नाहीत.
त्यानंतर गौतमीने घराचा आर्थिक भार उचलला.
पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमीत तिने नृत्याचं प्रशिक्षण घेतलं.
सुरुवातीला तिला बॅक डान्सर म्हणून काम करावं लागलं.
महेंद्र बनसोडे यांनी तिला अकलूज लावणी महोत्सवात पहिल्यांदा संधी दिली.
त्यानंतर तिला अनेक नृत्य कार्यक्रम मिळू लागले.