जनरल डायरचा खरचं उधम सिंहांनी वध केला होता का? जाणून त्याच्या मृत्यू मागचं खरं कारण...

Manoj Bhalerao

आपल्यापैकी बऱ्याचं लोकांना असं वाटतं की जालियनवाला बाग मध्ये भारतीयांना मृत्यूमुखी पाडणाऱ्या जनरल डायरला सरदार उधम सिंहांनी गोळ्या घातल्या.

Udham Singh | Esakal

मात्र, हा सारख्या नावामुळे निर्माण झालेला गैरसमज आहे. जनरल रेजीनाल्ड डायरचा मृत्यू 23 जुलै 1927 रोजी सेरेब्रल हॅमरेज आणि आर्टिरिओस्क्लेरोसिसमुळे म्हणजेचं मेंदूतील रक्तस्त्रावामुळे झाला.

General Reginald Dyer | Esakal

मग, हा प्रश्न पडतो की सरदार उधम सिंह यांनी नेमकं मारलं कोणाला? आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला गेलाय का ?

Vicky Kaushal as Udham Singh | Google

उधम सिंह यांनी ज्याला मारलं त्याचं नाव होतं मायकल ओ' डायर. जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा घडलं, तेव्हा मायकल डायर पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता.

micheal O'Dwyer | Esakal

पंजाबचा गव्हर्नर राहिलेल्या मायकल ओ'डायरची उधम सिंहांनी लंडनच्या कॅक्सटन हॉलमध्ये गोळी झाडून हत्या केली होती.

Udham Singh | Esakal

३१ जुलै १९४०ला त्यांना लंडनमध्ये फाशी देण्यात आली. त्यांच्या अस्थी जालियनवाला बाग या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.

Udham Singh | Esakal

सरदार उधम सिंह यांना याआधीही अटक करण्यात आली होती. भगत सिंह यांच्या क्रांतिकारी संघटनेशी त्यांचा संबंध असल्याच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Bhagat Singh | Esakal