Monika Shinde
योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याचा संतुलित संवाद. हिवाळ्यात नियमित योग केल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि चेहरा तरुण व तजेलदार दिसतो. चला जाणून घेऊया, असे कोणते योगासन जे सौंदर्य वाढवतात आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वासाने उजळवतात.
प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवण्याची कला. नियमित प्राणायाम केल्याने त्वचेला ताजेपणा मिळतो, सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज वाढतो.
सूर्यनमस्कार हे पूर्ण शरीरासाठी लाभदायक आसन आहे. हिवाळ्यात याचा सराव केल्याने चेहऱ्याचा रक्तप्रवाह वाढतो आणि त्वचेवर नैसर्गिक तेज झळकू लागते.
ध्यानामुळे मन शांत होते आणि त्याचा सकारात्मक परिणाम चेहऱ्यावरही दिसतो. तणाव व चिंतेमुळे होणाऱ्या सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर ताजेपणा व नैसर्गिक तेज निर्माण होतं
सेतुबंधासन रक्तप्रवाह वाढवते, चेहऱ्यावर चमक आणते आणि सूज कमी करते. ताजेतवाने दिसण्यासाठी उपयुक्त आसन आहे.
भ्रामरी प्राणायामाने मन शांत होते, चेहऱ्याला नवा तेज येतो आणि हाडांचा ताण कमी होतो, ज्यामुळे चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसतो.
योगात चेहऱ्याचा हलका मसाज रक्ताभिसरण सुधारतो आणि त्वचा ताजी, लवचिक बनते. हिवाळ्यात याने त्वचेला पोषण मिळते.
फिश पोज ताण कमी करतो आणि गळ्याचा लवचिकपणा वाढवतो. पावसाळ्यात सुरकुत्या आणि काळ्या रेषा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.