जिराफासारखी लांब मान असलेला हा अद्भुत प्राणी तुम्ही पाहिला का?

सकाळ डिजिटल टीम

आकर्षक प्राणी

जिराफासारखी लांब मान आणि हरणाराखा सुंदर व आकर्षक प्राणी तुम्ही पाहीला का? या प्राण्याचे नाव काय आहे आणि तो कुठे अढळतो जाणून घ्या.

Giraffe

|

sakal 

वन जिराफ

ओकापी हा प्राणी खऱ्या अर्थाने 'हरीण' नाही, पण त्याचे शरीर हरणासारखे दिसते आणि तो जिराफच्या कुटुंबातील (Giraffidae) आहे. त्यामुळे त्याला कधीकधी "वन जिराफ" (Forest Giraffe) असेही म्हणतात.

Giraffe

|

sakal 

लांब मान

त्याची मान जिराफासारखी खूप लांब नसली तरी, हरणापेक्षा निश्चितच लांब असते.

Giraffe

|

sakal 

अनोखे पट्टे

त्याचे शरीर तपकिरी रंगाचे असते आणि त्याचे मागचे पाय तसेच कमरेचा भाग झेब्राप्रमाणे पांढऱ्या-काळ्या पट्ट्यांनी झाकलेला असतो.

Giraffe

|

sakal 

निवासस्थान

हा खूप दुर्मिळ आणि लाजाळू प्राणी असून तो केवळ डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोच्या (DRC) घनदाट वर्षावनात (Rainforest) आढळतो.

Giraffe

|

sakal 

लांब जीभ

त्याची जीभ काळ्या किंवा गडद निळ्या रंगाची आणि खूप लांब (सुमारे 30-35 सेमी) व लवचिक असते. ही जीभ तो झाडांची पाने आणि कळ्या ओढण्यासाठी वापरतो आणि विशेष म्हणजे तो आपल्या कानापर्यंत पोहोचण्यासाठीही तिचा वापर करू शकतो!

Giraffe

|

sakal 

शोध

पाश्चात्त्य विज्ञानासाठी हा प्राणी 1900 सालापर्यंत पूर्णपणे अज्ञात होता. त्याची रहस्यमय उपस्थिती आणि लाजाळूपणा यामुळे तो जगासमोर खूप उशिरा आला.

Giraffe

|

sakal 

आहार

ओकापी हा शाकाहारी (Herbivore) प्राणी आहे. तो जंगलातील पाने, कळ्या, गवत, फळे आणि कधीकधी खनिज आवश्यकता पूर्ण करण्यासाठी नदीकाठची चिकणमाती (Clay) खातो.

Giraffe

|

sakal 

राष्ट्रीय प्रतीक

ओकापी हा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोचा (DRC) राष्ट्रीय प्राणी आणि प्रतीक आहे, ज्याचा उपयोग तेथील चलन आणि इतर चिन्हांवर केला जातो.

Giraffe

|

sakal 

Goat Milk Benefits : शेळीचे दूध आरोग्याचा खजिना! जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे

Goat Milk Benefits

|

esakal

येथे क्लिक करा