संतोष कानडे
संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये आहे. तो धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्यामुळे मुंडे अडचणीत सापडले आहेत, त्यांच्या मंत्रिपद अडचणीत आहे.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या मैत्रीबद्दल स्व. गोपीनाथराव मुंडेंनी साधारण ११ वर्षांपूर्वी केलेलं विधान खरं ठरत असल्याचं दिसतंय.
वाल्मिक कराड हा धनंजयच्या आयुष्यात कधीच काही चांगलं आणू शकणार नाही, असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते.
जोपर्यंत धनंजयला वाल्मिकबद्दल कळणार नाही, तोपर्यंत त्याचं भलं होणार नाही, असंही गोपीनाथ मुंडे बोलले होते
''वाल्मिक कराड हा अत्यंत क्रूरपणे राजकारण करतो, धनंजयने वाल्मिकला सोडल्यानंतरच त्याचं भलं होईल'' हे मुंडेंचं वाक्य आहे.
त्यामुळे मला वाल्मिकसोबत धनंजयशी तडजोड करायची नाही, अशी गोपीनाथ मुंडेंची भूमिका होती.
पत्रकार आणि 'अॅनालायझर'चे संपादक सुशील कुलकर्णी यांच्यासोबत गोपीनाथराव मुंडेंनी २०१४ मध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
आज धनंजय मुंडे अडचणीत सापडल्याचं दिसतंय, ते वाल्मिक कराडमुळेच. संतोष देशमुख खून प्रकरणामुळे वाल्मिक कराड जेलमध्ये आहे.
वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंच्या पालकमंत्रीपदाची सर्व सूत्र हातात घेऊन जिल्ह्याचा कारभार पाहिला, असा आरोप आहे.
धनंजय मुंडेंच्या कृषी खात्यासुद्धा वाल्मिकने भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे, त्यामुळेच धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होतेय