पेरूमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना, जाणून घ्या 'हे' आश्चर्यकारक फायदे

Monika Lonkar –Kumbhar

पेरू

पेरू हे फळ खायला सगळ्यांनाच आवडते.

आरोग्य

पेरू आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो.

पोषकतत्वे

पेरूमध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते.

व्हिटॅमिन सी

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, कर्बोदके, फायबर, पोटॅशिअम, कॅल्शिअम इत्यादी पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण असते.

वजन राहते नियंत्रणात

पेरूमध्ये फायबर आणि प्रथिनांचे विपुल प्रमाण आढळते. पेरूचे सेवन केल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाण्यापासून बचाव होतो.

मेंदूसाठी फायदेशीर

पेरूमध्ये व्हिटॅमिन-बी3 आणि व्हिटॅमिन-बी6 पुरेशा प्रमाणात आढळते. जे मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो

पेरूमध्ये पोटॅशिअम आणि फायबर्स पुरेशा प्रमाणात आढळते. जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या 'या' डाळींमध्ये लपलाय प्रथिनांचा खजिना