Guava Juice in Summer : उन्हाळ्यात घरी बनवा पेरूचं आयुर्वेदिक सरबत

सकाळ डिजिटल टीम

आजवर तुम्ही लिंबूचे,कैरीचे सरबत ट्राय केले असेल. पण कधी पेरूचं सरबत ट्राय केलय काय?

उन्हाळ्याच्या दिवसात आता पेरूचं सरबत ट्रेंडिंग आहे.

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि फायबर असते जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि पचन सुधारते.

पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

हे बनवणे सोपे आहे.

पेरू, पाणी आणि मध मिक्सरमध्ये बारीक वाटून मिश्रण ग्लासमध्ये गाळून घ्या.

जिरे पूड, वेलची पूड आणि पुदिना घालून मिक्स करा आणि सर्व्ह करा.

तुम्ही तुमच्या आवडीनुसार सरबतमध्ये इतर फळे जसे की केळी, स्ट्रॉबेरी किंवा संत्री देखील घालू शकता.

तुम्ही सरबत अधिक गोड बनवण्यासाठी खजूर किंवा ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता.

विशेषतः उन्हाळ्यात थकवा आणि निर्जलीकरण अनुभवणाऱ्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे.

पेरू पासून बनवलेले हे आयुर्वेदिक सरबत उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्याचा आणि निरोगी राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे.