Amit Ujagare (अमित उजागरे)
भारताच्या रॉ (RAW) संस्थेनं पाकिस्तानच्या अणुबॉम्ब योजनेविरुद्ध राबवलेलं हे मिशन होतं, ते अत्यंत गुप्त आणि धोकादायक होतं.
रावळपिंडीजवळ असलेल्या कहुता गावात पाकिस्ताननं ‘प्रोजेक्ट 706’ अंतर्गत अणुबॉम्ब बनवण्याची तयारी सुरू केली होती.
भारतीय गुप्तहेरांनी या प्रकल्पात काम करणाऱ्यांचे केस जमा करून भारतात आणले होते. त्याच्या तपासणीतून पाकिस्तानात अणुप्रकल्प तयार होत असल्याचं समोर आलं होतं.
पुढील टप्पा होता, कहुतामधील हालचालींचे ब्लूप्रिंट मिळवणं. हे मिशन अत्यंत धोकादायक होतं!
हे मिशन सुरू ठेवण्यासाठी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची परवानगी आवश्यक होती. पण इथेच माशी शिंकली.
देसाई आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया उल हक यांच्यात मैत्रीपूर्ण संभाषण सुरू असायची.
फोनवर बोलताना मोरारजी देसाईंना झिया उल हकला म्हणाले, “माझ्या हेरांनी कहुतामध्ये काहीतरी हालचाल सुरु असल्याचं सांगितलं आहे”
ही माहिती मिळाल्यानंतर झिया उल हक यांनी कहुतामध्ये ऑपरेशन सुरू केलं आणि RAW चे हेर पकडून ठार मारले.
ही माहिती गुप्त राहायला हवी होती, पण पंतप्रधानांच्या एका वाक्यामुळं 'रॉ'ला इतिहासातलं सर्वात मोठं नुकसान सहन करावं लागलं.
मोरारजी देसाईंची ही चूक होती की त्यांनी हेतुपुरस्सर गुप्त माहितीचं उघड केली. यासंशयातून ऑपरेशन कहुता आजही अनेकांच्या संशयाच्या भोवऱ्यात आहे.