Mayur Ratnaparkhe
भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय़ महत्त्वाचा आहे.
या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरुचं पुजन करतो.
शास्त्रातील माहितीनुसार या पवित्र दिवशी आपल्या हातून काही चुका होण्यापासून टाळलं पाहिजे.
गुरुसमोर खाली बसून लीन व्हावे, गुरुच्या आसनाच्या बरोबरीने बसू नये.
या दिवशी गुरुचं दर्शन घेण्यास जाताना रिकाम्या हाती जावू नये.
गुरुसमोर अपशब्द वापरू नयेत, ज्यामुळे त्यांचा अपमान होईल अशी कुठलीही कृती करू नये.
गुरू शब्द टाळू नये, गुरूच्या शिकवणी विरुद्ध आपले आचरण ठेवू नये, त्यांच्या ज्ञानाचा अपमान करू नये