गुरु पुष्य योगात करा 'या' 5 गोष्टींची खरेदी, सुख-समृद्धी ठरेल तुमची साथी!

Monika Shinde

आज

२४ जुलै रोजी 'हरियाली अमावस्या' साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा नदीसह इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे. स्नानानंतर माते गंगा आणि भगवान शंकराची पूजा-अर्चना केली जाते. या दिवशी पितृ तर्पण आणि पिंडदान करण्याचीही परंपरा आहे.

यावर्षी

यावर्षी या अमावास्येच्या दिवशी गुरु पुष्य नक्षत्र, शिववास योग, हर्षण योग आणि अमृत सिद्धी योग हे चारही शुभ संयोग एकत्र येत आहेत

गुरु पुष्य योग कधी?

हरियाली अमावास्येला गुरु पुष्य योग २४ जुलै रोजी सायंकाळी ०४:४३ वाजल्यापासून ते २५ जुलै रोजी सकाळी ०५:३९ वाजेपर्यंत राहणार आहे.

शिववास योग

हरियाली अमावास्येच्या दिवशी शिववास योग रात्री १२:४० वाजेपर्यंत असणार आहे.

हर्षण योग आणि अमृत सिद्धि योग

या दिवशी हर्षण योग सकाळी ०९:५१ वाजेपर्यंत, तर अमृत सिद्धि योग संपूर्ण दिवसभर राहणार आहे.

वस्तू नक्की खरेदी करा

या पवित्र योगात सोने किंवा चांदीचे दागिने, शंख किंवा कलश, चंदन व धूपदीप, शृंगार साहित्य, तांदूळ, गहू किंवा धान्य या वस्तू खरेदी केल्यास नशीब खुलते.

अन्नाचे 'हे' प्रकार जास्त खाल्ल्याने वाढते पोट आणि वजन!

येथे क्लिक करा