हार्दिक पांड्या T20 मध्ये 'हा' पराक्रम करणारा एकमेव भारतीय

Pranali Kodre

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोमवारी (७ एप्रिल) १२ धावांनी पराभूत केले.

Hardik Pandya | Sakal

हार्दिक पांड्या

पण असे असले तरी या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली होती.

Hardik Pandya | Sakal

अष्टपैलू कामगिरी

हार्दिकने या सामन्यात आधी गोलंदाजी करताना २ विकेट्स घेतल्या, तर नंतर फलंदाजी करताना त्याने १५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४२ धावांची खेळी केली.

Hardik Pandya | Sakal

२०० विकेट्स

हार्दिकने २ विकेट्स घेण्यासोबतच त्याने टी२० कारकि‍र्दीत २०० विकेट्सचा टप्पा पार केला. त्यामुळे त्याने खास विक्रमही केला.

Hardik Pandya | Sakal

टी२० क्रिकेटमधील धावा

हार्दिकने टी२० क्रिकेट कारकि‍र्दीत २९१ सामन्यात ५४३२ धावा केल्या आहेत.

Hardik Pandya | Sakal

पहिलाच भारतीय अष्टपैलू

यामुळे हार्दिक टी२० क्रिकेटमध्ये ५००० धावा करणारा आणि २०० विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.

Hardik Pandya | Sakal

कोणत्याच भारतीयाला जमलं नव्हतं

यापूर्वी कोणत्याच भारतीय अष्टपैलू खेळाडूला टी२० मध्ये ५००० धावा आणि २०० विकेट्स असे दुहेरी टप्पे पार करता आले नव्हते.

Hardik Pandya | Sakal

खूप राग आला तर काय करायचं? MS Dhoni म्हणतो...

MS Dhoni | Sakal
येथे क्लिक करा