Swadesh Ghanekar
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उप कर्णधार हार्दिक पांड्याने चमकदार कामगिरी करून दाखवली. तो क्रिकेटच्या मैदानावर यशाचा आनंद घेत आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आघाडीवर संघर्ष करत आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हार्दिक-नताशा बरेच दिवस झाले सोबत न दिसल्याने ही चर्चा रंगली आहे.
अनंत आणि राधिका अंबानी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या लग्नात हार्दिक पांड्या एकटाच दिसल्याने घटस्फोटाच्या चर्चा अधिक बळावल्या. या प्रकरणांवर नताशाचे मौन देखील बरेच संकेत देते आहेत.
या अफवांकडे दुर्लक्ष करता हार्दिकची पत्नी कालच मुलासोबत परदेशात गेली आहे. सोशल मीडियावर तिचे व मुलगा अगस्त्या यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
नताशा स्ँटकोव्हिच ही नागरिकत्वाने सर्बियन आहे. ती सर्बियन डान्सर, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने १ जानेवारी २०२० रोजी क्रिकेटपटू हार्दिकसोबत एंगेजमेंट केली. तरीही तिच्याकडे अजूनही भारतीय नागरिकत्व नाही.
नताशा आणि हार्दिकच्या घटस्फोटाच्या अफवा फक्त एक महिन्यापूर्वी सुरू झाल्या जेव्हा एका रेडिट वापरकर्त्याला त्यांच्या विभक्त झाल्याचा संशय आला.
नताशसा स्टॅनकोव्हिच याआधी आयपीएल सामन्यांमध्ये हार्दिकला पाठिंबा देताना दिसली होती. पण, आयपीएल २०२४ मध्ये ती दिसलीच नाही. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही तिच्याकडून हार्दिकचे कौतुक झालेले नाही.
२०१२ मध्ये नताशा अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी भारतात आली. तिने जॉन्सन अँड जॉन्सन या ब्रँडसाठी मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. २०१३ मध्ये तिने प्रकाश झा दिग्दर्शित सत्याग्रह या चित्रपटाद्वारे तिच्या हिंदी चित्रपटात पदार्पण केले.
२०१४ मध्ये नताशा बिग बॉस ८ मध्ये दिसली होते आणि ती एक महिना त्या घरात राहिली. बादशाह आणि आस्था गिल यांच्या "डीजे वाले बाबू " गाण्यातून तिला लोकप्रियता मिळाली. २०१६ मध्ये, ती सौरभ वर्मा दिग्दर्शित 7 अवर्स टू गो या चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिने पोलिसाची भूमिका साकारली होती.