Aarti Badade
मराठी फक्त एक भाषा नाही, तर वेगवेगळ्या भागांत वेगळ्या चवीने बोलली जाणारी संस्कृती आहे.
विदर्भात वऱ्हाडी बोलीची सहजता आणि झाडीबोलीचा ग्रामीण बाज खूप वेगळा आहे.
मराठवाडी बोली सामान्य माणसाच्या भावना थेट पोहोचवते. ती खूप खरीखुरी आहे.
कोकणातल्या प्रत्येक गावात बोली थोडी वेगळी असली तरी ती तितकीच लडिवाळ आहे. यात मालवणी, आगरी, कोकणी बोली येतात.
पश्चिम महाराष्ट्रातल्या बोलींमध्ये शब्दांच्या उच्चारातला रुबाब आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसतो. उदा. पुणेरी, कोल्हापुरी बोली.
खानदेशातील जीवनशैलीचे बोलके दर्शन अहिराणी आणि डांगी बोलींमधून घडते.
तंत्रज्ञान, शहराकडे होणारे स्थलांतर आणि शिक्षणाचे माध्यम बदलल्यामुळे काही बोलीभाषा आता लोप पावत आहेत.
कोळी, पारधी, वडारी यांसारखे शब्द आता पुस्तकातही कमी दिसतात. लोकांच्या तोंडून ते जवळपास नाहीसे झाले आहेत.
प्रत्येक बोलीभाषेतून त्या समाजाचे ज्ञान, कला, संस्कृती आणि इतिहासही जपला जातो.