सकाळ डिजिटल टीम
सफरचंदाचा ज्युस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हा ज्युस पिल्यास कोणते आजार दूर होतात जाणून घ्या.
सफरचंदाच्या ज्युसमध्ये असलेले पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि हृदयरोगांचा धोका कमी करण्यास मदत करतात.
सफरचंदाच्या ज्युसमध्ये असलेले नैसर्गिक फायबर आणि सोर्बिटॉल पचन प्रणालीलानिरोगी ठेवतात आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्यामुळे सफरचंदाचा ज्युस शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.
या ज्युसमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
नैसर्गिक साखरेमुळे सफरचंदाचा ज्युस शरीराला त्वरित ऊर्जा देतो, ज्यामुळे थकवा दूर होण्यास मदत मिळते.
सफरचंदाच्या ज्युसमध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
सफरचंदाचा ज्युस मेंदूतील पेशींचे (brain cells) नुकसान होण्यापासून बचाव करतो आणि अल्झायमर सारख्या रोगांचा धोका कमी करू शकतो.
सफरचंदाच्या ज्युसमध्ये लोह (iron) असते, जे ॲनिमियासारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी मदत करू शकते.