सकाळ डिजिटल टीम
पुर्विपासुनच वडाच्या झाडाला खुप महत्व आहे.
धार्मिक दृष्ट्या तर वडाला महत्व आहेच, त्याच बरोबर आयुर्वेदात देखील वडाला खुप महत्व आहे.
वडाच्या पानांचा आणि सालीचा उपयोग दातदुखी कमी करण्यासाठी केला जातो.
वडाचे तेल आणि दूध त्वचेच्या समस्यांवर उपयुक्त आहे, जसे की खाज आणि सूज.
वडाची साल आणि पाने केसगळती कमी करण्यासाठी मदत करतात.
वडापासून तयार केलेल्या औषधांचा उपयोग मासिक पाळीच्या विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहे आणि अनेकजण त्याची पूजा करतात.
वटवृक्षाला सावित्री मातेचे रूप मानले जाते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत केले जाते.
वडाचे झाड हवा शुद्ध करते आणि पर्यावरणाला मदत करते.