Monika Lonkar –Kumbhar
भरपूर पोषकतत्वांनीयुक्त असलेली काळी खजूर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.
काळ्या खजूरमध्ये डायट्री फायबर, लोह, प्रथिने, पोटॅशिअम, खनिजे आणि मॅग्नेशिअमचा समावेश असतो. त्यामुळे, या काळ्या खजूरचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
काळ्या खजूरचे सेवन केल्याने पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.
काळ्या खजूरमध्ये लोहाचे विपुल प्रमाण आढळते. त्यामुळे, काळ्या खजूरचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढते.
हाडांच्या मजबूतीसाठी आणि बळकटीसाठी काळी खजूर अतिशय उपयुक्त आहे.
काळ्या खजूरमध्ये आढळून येणाऱ्या लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअममुळे रक्तदाब नियंत्रित ठेवला जाऊ शकतो.
काळ्या खजूरचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.