गुलकंद सोडा, थेट गुलाबाच्या पाकळ्या खाण्याचेही आहेत भरपूर फायदे!

Sudesh

गुलाब

गुलाबाला आपल्याकडे फुलांचा राजा म्हणून ओळखलं जातं. प्रेमाचं प्रतीक समजलं जाणारं हे फूल आरोग्यासाठी देखील भरपूर फायद्याचं आहे.

Rose Petals Benefits | eSakal

त्वचा

गुलाबाच्या फुलाचा त्वचेसाठी भरपूर फायदा होतो. यामुळेच चेहऱ्यावर रोज वॉटर लावण्याला प्राधान्य दिलं जातं. गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने देखील असाच फायदा होतो.

Rose Petals Benefits | eSakal

ड्रायनेस

गुलाबाच्या पाकळ्यांचं सेवन केल्यामुळे त्वचेची ड्रायनेस कमी होते, आणि त्वचा तजेलदार होते.

Rose Petals Benefits | eSakal

इन्फेक्शन

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेचे डॅमेज सेल्स रिपेअर होतात. तसंच, स्किन इन्फेक्शनही दूर राहतं.

Rose Petals Benefits | eSakal

व्हिटॅमिन

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, आयर्न आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं.

Rose Petals Benefits | eSakal

थंडावा

गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार केला जातो. याचं सेवन केल्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यास मदत मिळते.

Rose Petals Benefits | eSakal

पोटाचे विकार

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये लॅक्सेटिव्ह आणि डाययुरेटिक गुण आढळतात. पोट साफ करणे आणि शरीरातून टॉक्सिन बाहेर टाकणे यासाठी गुलाब खाणं फायद्याचं ठरतं.

Rose Petals Benefits | eSakal

लाल गुलाब

सर्व प्रकारच्या गुलाबांपैकी, आरोग्यासाठी लाल गुलाब हे सर्वात फायद्याचं मानलं जातं.

Rose Petals Benefits | eSakal

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. सर्वांनाच ही समान लागू होईल असं नाही. कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा वा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Rose Petals Benefits | eSakal
Gulkand Recipe | eSakal