Monika Shinde
मोड आलेली मेथी आपल्या आरोग्यासाठी एक अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे. यात अनेक पोषक घटक असतात. परंतु ती जर मोड आलेली असेल तर तिच्या फायदे होतात.
मोड आलेली मेथी पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप प्रभावी ठरते. या बियांच्या सेवनाने अपचन आणि गॅस समस्या देखील कमी होतात.
मोड आलेली मेथी रक्तशुद्धीकरणासाठी चांगली आहे. ती शरीरातील विषारी घटकांपासून मुक्त होण्यासाठी मदत करते. यामुळे त्वचेवर येणारे पुरळ आणि इतर समस्याही कमी होतात.
हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी मोड आलेली मेथी फायद्याची आहे. रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते.
मोड आलेली मेथी वजन कमी करण्यास मदत करते. ती शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत फायदेशीर आहे. त्यात हाय फायबर्स असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारतात आणि दीर्घकाळ भूक लागत नाही.
मोड आलेली मेथी डायबिटीसच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. ती शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
महिलांसाठी, मोड आलेली मेथी हॉर्मोनल संतुलन राखण्यासाठी फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या समस्यांवर तिने उत्तम परिणाम दाखवले आहेत.