पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे मसूर डाळ

Monika Lonkar –Kumbhar

भारतीय स्वयंपाकघरात हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे वरण आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ होय.

Benefits of Masoor Dal

विविध प्रकारच्या डाळींचा आणि कडधान्यांचा आपल्या आहारात प्रामुख्याने समावेश असतो. या डाळींमध्ये तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ इत्यादी डाळींचा समावेश होतो. 

Benefits of Masoor Dal

या डाळींपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. या डाळींमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते.

Benefits of Masoor Dal

मसूर डाळ

अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली मसूर डाळ आपल्यातील अनेक जण चवीने खातात. ही मसूर डाळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. 

Benefits of Masoor Dal

हृदयासाठी फायदेशीर

जर तुम्हाला हृदयरोग किंवा वाढत्या कॉलेस्ट्रॉलची समस्या भेडसावत असेल तर तुमच्या आहारात मसूर डाळीचा समावेश करा. यामुळे, शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉलची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. 

Benefits of Masoor Dal

वजन नियंत्रित राहते

मसूर डाळीमध्ये प्रथिनांचे आणि कर्बोदकांचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, जेव्हा आपण या डाळीचे सेवन करतो तेव्हा, आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे, फार भूक लागत नाही. त्यामुळे, आपल्या शरीराचे वजन देखील नियंत्रणात राहते.

Benefits of Masoor Dal

मधुमेहींसाठी लाभदायी

मसूर डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो, त्यामुळे या डाळीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. परिणामी, मधुमेहाची समस्या देखील टाळता येते. 

Benefits of Masoor Dal

'परी म्हणू की सुंदरा'..! माधुरीचा दिलखुलास मल्टिकलर अंदाज

Madhuri Dixit | esakal