Aarti Badade
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर, चांगल्या प्रकारची चरबी, मॅग्नेशियम, लोह, झिंक आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.
मॅग्नेशियममुळे हृदय आरोग्य, झोप, हाडं आणि स्नायूंना मजबुती मिळते. भोपळ्याच्या बियांमधून नैसर्गिकरित्या हे मिळते.
कॅरोटीनॉइड्स आणि व्हिटॅमिन ई सारखे अँटीऑक्सिडंट्स पेशींचं संरक्षण करतात आणि सूज कमी करतात.
LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) कमी आणि HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) वाढवण्यात मदत होते.
झिंक आणि व्हिटॅमिन ई मुळे शरीराची प्रतिकारशक्ती बळकट होते आणि संसर्गापासून बचाव होतो.
BPH (सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया) ची लक्षणे कमी करण्यात मदत होते.
ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करतं, जे झोप आणि मूड संतुलित ठेवतात.
फायबरमुळे आतड्याचं आरोग्य सुधारतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि भरपूर मॅग्नेशियममुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.